राज्यातील मंत्री मंडळाची नेत्याने केली तारीख जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२३ ।  दि ११ मे रोजी राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला. या निकालामुळे एवढ्या दिवसांपासून रखडलेला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होईल अशी आशा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू यांनी थेट मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख देखील जाहीर केली आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकारने जल्लोष साजरा केला. यानंतर आता या सरकारमधील अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे. २१ ते २६ मेदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशा बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच जर आता मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही तर थेट २०२४ नंतर हा विस्तार होईल असा टोला देखील यावेळी कडूंनी लगावला आहे.

काही बाजू सोडल्या तर निकाल हा न्यायाच्या बाजूनेच झाला आहे असं बच्चू कडू म्हणाले. तसेच शिंदे फडणवीसांनी केलेली व्हिव रचना यशस्वी झाली. म्हणुणच काम करणारे मुख्यमंत्री आहे. आपण सर्वजण पाहती मुख्यमंत्री रात्री उशिरापर्यंत देखील काम करत असतात असं देखील बच्चू कडू यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम