मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण : नव्या घरांसाठी म्हाडाची सोडत !
दै. बातमीदार । ७ मे २०२३ । देशातील प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते आपले स्वतहाचे घर असावे त्यातच जर ते घर मुंबईत मिळाले तर दुप्पट आनंद व्यक्तीला होत असते. त्यामुळे सरकार वेळोवेळी योजना काढून नागरिकांना घरे देत असतात. अनेकजन म्हाडाच्या लॉटरीवर अवलंबून राहतात. मात्र आता म्हाडाच्याच्या माध्यमातून अनेकांचे हक्काचे घर स्वस्त दरात मिळवण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवलीतील रुणवाल समूहाचे 621 प्रकल्प, वसई, विरार, नवी मुंबई आणि ठाणे येथील 20 टक्के प्रकल्पांचा समावेश सर्वसमावेशक योजनेतील करण्यात येणार असून, 10 मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतील शिल्लक घरांचा दिवाळीतील सोडतील समावेश असणार आहे.
नवीन सोडत प्रक्रियेद्वारे कोकण मंडळातील 4 हजार 654 घरांना सोडत काढण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्याने अनेक इच्छुक सोडतीपासून दूर राहिले आहेत. त्यामुळेच या सोडतीसाठी फारच कमी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र ज्यांना अर्ज करता आला नाही किंवा ज्यांना मुंबई महानगर प्रदेशात हक्काचे घरे घ्यायची आहेत त्यांच्यासाठीच कोकण मंडळाने येत्या दिवाळीत सोडत काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्याधिकारी यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम