प्रसिद्ध गायिकेने मुलांना घेवून देश सोडला !

बातमी शेअर करा...

बॉलीवूड क्षेत्रात अनेकदा अभिनेते व अभिनेत्रीच्या प्रायव्हेट आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो त्याच पाठोपाठ एका गायीकेवर मुलांना घेवून देश सोडण्याची वेळ आली आहे. कारणही तसेच काही आहे पती व पत्नीमधील.

प्रसिद्ध पॉप सिंगर शकीरा पती जेरार्ड पिकपासून विभक्त झाली आहे. एक्स पतीपासून विभक्त झाल्यानंतर सिंगरने जेरार्डसोबत सुंदर क्षण घालवलेले ठिकाण सोडण्याचा निर्णयही घेतला आहे. शकीराने बार्सिलोना सोडलं आहे. बार्सिलोना सोडताना शकीरा खूपच भावूक झाली आहे. तिचा रडणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, कोलंबियन पॉप स्टार शकीराला जेरार्डच्या वडिलांनी ‘बेदखल नोटीस’ बजावल्यानंतर मियामीला जात असल्याचं कळतं.

स्पॅनिश प्रेसच्या वृत्तानुसार, गायिकेला १३ मार्च रोजी पिकच्या वडिलांकडून ३० एप्रिलपर्यंत त्यांचं घर रिकामं करण्यास किंवा नुकसान भरपाई देण्यास सांगणारा एक ईमेल देण्यात आला होता. आता, शकीराचा विमानतळावरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या खाजगी जेटमध्ये चढण्यापूर्वी मित्र आणि कुटुंबियांना घट्ट मिठी मारली. ११ एप्रिलपासून तिची मुलं मिलन आणि साशा हे दोघे अमेरिकेतील शाळेत जातील असंही म्हटलं जात आहे. ३५ वर्षीय जेरार्ड पिक, जो एफसी बार्सिलोनाकडून खेळायचा, तो सध्या २४ वर्षीय क्लारा चिया मार्टीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता शकीराला जेरार्डपासून शक्य तेवढ्या दूर जायचे आहे. डबल-डेनिम घातलेली शकीरा विमानतळावर खूप भावूक दिसली.

 

चाहत्यांसाठी लिहिली खास नोट
रविवारी, शकीराने देश सोडताना आपल्या चाहत्यांसाठी एक ट्वीट लिहिले, ‘मी माझ्या मुलांना स्थिरता देण्यासाठी बार्सिलोनामध्ये स्थायिक झाले परंतु आता आम्ही जगाच्या दुसऱ्या बाजूला जात आहोत. आज आम्ही आनंदाच्या शोधात एक नवीन अध्याय सुरू करतो. ज्यांनी मला प्रोत्साहन दिले, माझे अश्रू पुसले, मला प्रेरणा दिली आणि मला घडवले त्या सर्वांचे आभार. याशिवाय शकीराने तिच्या स्पॅनिश चाहत्यांचेही आभार मानले आहेत. शकीराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटोही शेअर केला आहे. सिंगरने कॅटलानची राजधानी सोडताना फ्लाइटचा फोटोही शेअर केला होता. यासोबत त्याने कॅप्शन लिहिले- ‘गोष्टी आपण स्वप्नात पाहतो तशा नसतात. आपण कुठेतरी पोहोचण्यासाठी खूप धावतो पण पोहोचत नाही’.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम