राज्यातील शेतकरीना वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री शिंदे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ मार्च २०२३ । राज्याच्या विधानसभेत १७ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसात ज्या शेतकरीचे नुकसान झाले असेल त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे. आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात गेल्या दोन दिवसांत अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. विशेषतः नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजून सुरू करण्यात आलेले नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी पवार यांनी केली. शिंदे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यांत नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम