यंदाचे पहिले चंद्रग्रहण होणार उद्या ; या मंत्राचा करा जप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मे २०२३ ।  प्रत्येक वर्षी चंद्रग्रहण होत असते काही लोकांसाठी हे शुभ मानले जाते तर काहीसाठी अशुभ पण यंदाचे पहिले चंद्रग्रहण उद्या म्हणजेच ५ मे रोजी, वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला, बुद्ध पौर्णिमेच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. मात्र, हे ग्रहण नसून उपसावली आहे. जरी आपल्याला भारतात ते बघायला मिळणार नसले तरी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते खूप खास मानले जाते. वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे रोजी रात्री 08:46 वाजता सुरू होईल आणि रात्री 01:02 वाजता ग्रहण समाप्त होईल.

चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होते. पौराणिक कथेनुसार, जेव्हा राहू-केतू पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात. ग्रहणाच्या ९ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. जे धार्मिक आणि ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून अशुभ मानले जाते. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या काळात काही कामे करण्यास मनाई आहे. पण काही कामे अशी आहेत, जी केल्याने या काळात तुम्हाला ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.

चंद्रग्रहणाच्या वेळी या मंत्रांचा जप करा

– ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:

हा वैभव लक्ष्मीचा मंत्र आहे, या मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास मां लक्ष्मीची कृपा व्यक्तीवर राहते.

– ॐ ह्रीं बगलामुखी सर्व दुष्टानाम वाचं मुखम पदम् स्तम्भय,

चंद्रग्रहणाच्या वेळी बागलमुखी मातेच्या मंत्राचा जप करू शकता. असे केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते.

– चंद्रग्रहणाच्या वेळी धार्मिक मंत्रांचा जास्तीत जास्त जप करा आणि देवाचे स्मरण करा. तुम्ही गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा इतर मंत्रांचा जप करू शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम