पंजाबचे माजी मुख्यमंत्री येणार भाजपच्या तंबूत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ एप्रिल २०२३ ।  देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कोणत्याहि परिस्थिती कमी होत असतांना दिसत नसून अनेक नेते भाजपात येत असल्याने पुन्हा एकदा भाजपचे अनेक राज्यात वजन वाढताना दिसत आहे. कॉंग्रेस सरकारचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि मंत्रिमंडळातील त्यांचेच सहकारी नवज्योत सिंग सिध्दू यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चिवरून महाभारत झाले होते. त्यात अमरिंदर यांची खुुर्ची गेली, मात्र त्या खुर्चीने सिध्दू यांनाही हुलकावणी दिली. नंतर कॉंग्रेसचे सरकारच गेले आणि आम आदमी पक्ष राज्यात सत्तेवर आला.

केवळ येथेच हा विषय थांबला नाही. अमरिंदर यांनी स्वत:चा पक्ष काढला व तो भारतीय जनता पार्टीत विलीनही करून टाकला. तर सिध्दू यांची जुन्या हत्या प्रकरणात तुरूंगात रवानगी झाली. या सगळ्या नाट्यमय घडमोडींत चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. ते चन्नीही विधानसभेतील नामुष्कीजनक पराभवानंतर गायब झाले होते. आता प्रदीर्घ काळानंतर ते प्रकटले असून त्यासोबतच ते भाजपच्या वाटेवर असल्याची बातमीही आली आहे. दिल्या जात असलेल्या बातम्यांनुसार चन्नी यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मात्र कॉंग्रेस नेते प्रतापसिंह बाजवा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. भाजपकडूनच या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सिध्दू यांची सुटका झाली आहे.

तसेच जालंधर येथील कॉंग्रेस खासदाराच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून कॉंग्रेसला रामराम केलेल्या नेत्यालाच येथून आपने रिंगणात उतरवले आहे. हा घटनाक्रम पाहता पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर चन्नी राज्यातून बेपत्ताच झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ते दिसले होते. मात्र तेवढ्यापुरतेच. त्यांनी मध्यंतरी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेतली. पण त्यांची ठळक अनुपस्थिती नजरेत भरणारी होती. त्यांनी गांधी कुटुंबातील सदस्यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जाते. त्यात त्यांच्या कथित विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता सिध्दू यांच्या सुटकेनंतर कॉंग्रेसमध्ये पुन्हा उलथापालथ होण्याची शक्‍यता वर्तवली जाते आहे. अमरिंदर यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसकडे आता पंजाबमध्ये त्या तोडीचा नेता राहीलेला नाही. त्यामुळे सिध्दू यांच्यासाठी मार्ग निष्कंटक झाल्याचेही बोलले जाते आहे. त्यांनी दिल्ली वारी करून श्रेष्ठींकडून आशीर्वादही मिळवल्याकडे लक्ष वेधले जाते आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम