संजय राऊतांची देवेद्र फडणवीसांवर गंभीर आरोप !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ मार्च २०२३ । राज्यातील ठाकरे गट व भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यामधील राजकारण अगदी सर्व सामान्य माणसाना माहित आहे. तर ठाकरे गट यांच्यावर टीका करण्यासाठी एक हि संधी वाया जावू देत नाही, नुकतीच आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

तसेच राज्यात मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री असल्याचं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमृता फडणवीस प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले राऊत? संजय राऊत यांनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. राज्यातील अस्थिरता फडणवीसांनी समजून घ्यावी. फडणवीसांचे नाकानं कांदे सोलनं सुरू आहे. फडणवीसांचे हात दगडाखाली आडकले आहेत. राज्यात अराजकता माजली आहे.

विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल जात आहे. फडणवीस राहुल कुल यांना वाचवत आहेत का? असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.अमृता फडणवीसांवर प्रतिक्रिया अनिक्षा जयसिंघानी या व्यवसायने डिझायनर असलेल्या मुलीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. या बदल्यात तिने आपल्या वडिलांच्या सुटकेची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी पोलिसात तक्रार दिली असून, संबंधित मुलीला अटक करण्यात आलं आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण कौटुंबिक आहे. आम्हाला भाजपप्रमाणे कोणाच्या कुटुंबात घुसण्याची सवय नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना टोला दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. राज्यात मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम