भिडेंच्या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले !
बातमीदार | २ ऑगस्ट २०२३ | देशातील महापुरुषाबद्दल गेल्या काही दिवसापासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि अध्यक्ष संभाजी भिडे हे सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहत असून त्यांच्यावर गेल्या काही दिवसाआधी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असतांना महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापल्याचं चित्र सध्या दिसू लागले आहे. विरोधी पक्षांनी संभाजी भिंडेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संभाजी भिडेंचा हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजू लागला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून विधानसभेत विरोधी पक्ष संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. आजही २ ऑगस्ट विरोधी पक्षांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत विधानसभेत गोंधळ घातला. अखेर याप्रकरणी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करत संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या किल्ल्यांशी बहुजनांना जोडण्याचं काम करतात. हे त्यांचं कार्य चांगलं आहे. परंतु, त्यांना महापुरुषांबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. त्यांनाच काय, दुसऱ्या कोणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही. महापुरुषांबद्दल अशा प्रकारे वक्तव्ये केली तर कारवाई होईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम