सरकार ७२ तासात पडणार ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ ऑक्टोबर २०२३

राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारवर विरोधक जोरदार आरोप करीत असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गोप्यस्फोट केला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, पुढील 72 तासात राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार जाणार, असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. मी 72 तास आधीही बोललो होतो आता ती वेळ आली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच त्यांना नवीन वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळकाढूपणा केल्याचा ठपकाही सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांवर ठेवला आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सरकार पडणार असल्याचे भविष्य व्यक्त केले आहे. खासदार संजय राऊत सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी ICU मध्ये टाकून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता त्यांनाच ICU मध्ये जाण्याची वेळ आली आहे. सौ सोनार की एक लोहार की असे आजचे न्यायालयाचे मत आहे. हातोडा मारला आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम