राज्यपालांना बेताल वक्तव्य भोवणार : ३ डिसेंबरला रायगडावर आक्रोश

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आज उदयनराजे भोसले आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यत केला. शिवरायांबद्दल सध्या होत असलेल्या राजकारणामुळे लोक चिडलेले आहेत. त्यामुळे येत्या ३ डिसेंबरला सकाळी ७ वाजता रायगडावर जावून प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं. शिवाय आपण या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे उदयनराजेंनी जाहीर केलंय.

उदयनराजे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर महाराजांचं नाव घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. अशा पद्धतीने खडा टाकून बघणं चुकीचं आहे. हा सेन्सेटिव्ह विषय आहे. माझी वैयक्तिक विनंती आहे की, या प्रकरणाला राजकीय स्वरुप देऊ नये. त्यामुळेच महाराजांच्या समाधीस्थळी जावून आपण प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम