राज्यपाल अडकणार पुन्हा वादात ; राजभवनातील मॉडेलचे फोटो झाले व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ डिसेंबर २०२२ ।  गेल्या काही दिवसापासून राज्यपाल कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते आता पुन्हा नवीन एका वादात राज्यपाल कोश्यारी सापडले आहे. याचं कारण ठरली आहे एक मॉडेल. या मॉ़डेलचे राजभवनातले फोटो समोर आले असून त्यावरून मनसेने आक्षेप घेतला आहे. मायरा मिश्रा या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

 

यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसंच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, “ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?” या ट्वीटनंतर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम