मणिपूर प्रकरणी सुनावणी ‘या’ कारणाने ढकलली पुढे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जुलै २०२३ । देशाचे लक्ष लागून असलेल्या मणिपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार होती, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आज न्यायालयात आले नाहीत. त्यामुळे न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची आज सुनावणी होणार नाही.

मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड केल्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर हलवण्याची विनंती गृह मंत्रालयाने न्यायालयाला केली आहे. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या मोबाईलवरून या घटनेचा व्हिडीओ बनवला होता तोही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मोबाईल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.

मणिपूर प्रकरणासंदर्भात 27 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले की, हा मुद्दा न्यायालयात आधीच पाहिला जात आहे, त्यामुळे आणखी एका याचिकेची काय गरज आहे. तसेच, त्यांनी आपली याचिका सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर मांडण्यास सांगितले. याचिका दाखल करणारे वकील विशाल तिवारी यांनी खंडपीठाला सांगितले की, मणिपूर हिंसाचाराशी संबंधित प्रलंबित याचिका 28 जुलै रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध आहेत. तिवारी यांनी विनंती केली की संबंधित प्रकरणासह त्यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम