गृहमंत्र्यांनी उडविली विरोधकांच्या बैठकीची खिल्ली ;फक्त फोटो सेशन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ ।  आगामी लोकसभेत भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी देशातील तब्बल १५ पक्ष एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या बैठक नुकतीच झाली आहे. या बैठकीची गृहमंत्री अमित शहा यांनी खिल्ली उडवली आहे. शुक्रवारी जम्मूतील एका सभेत शहा म्हणाले की, ‘आज पाटण्यात फोटो सेशन सुरू आहे. कितीही पक्ष सभेला आले तरी ते कधीच एकत्र येणार नाहीत. विरोधी पक्षनेत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला आव्हान द्यायचे आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदी 300 हून अधिक जागांसह सरकार स्थापन करतील.’

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 15 हून अधिक पक्षांची पटना येथे विरोधी एकजुटीसाठी बैठक झाली. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संयुक्त विरोधी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने या पक्षांची सीएम हाऊसमध्ये बैठक होत आहे. शहा म्हणाले की, आज डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा हुतात्मा दिन आहे. मुखर्जी यांनी जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात काम केले होते. त्यांच्या बलिदानामुळेच बंगाल आज भारताचा भाग आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 ला विरोध केला. देशात दोन कायदे, दोन प्रधान आणि दोन निशाल चालणार नाहीत, असे ते म्हणाले होते.

शहा म्हणाले की, ‘मुखर्जी 1953 मध्ये कलम 370 विरोधात जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले होते. येथे त्यांना धोक्याने अटक करण्यात आली. त्यांची हत्या झाल्याचे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आता कलम 370 संपले आहे. त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे काश्मीर तयार होत आहे. शहा म्हणाले, यूपीएच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत 60 हजार 327 दहशतवादी घटना घडल्या. एनडीएच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत 70% कमी दहशतवादी घटना घडल्या आहेत. कलम 370 रद्द केल्यानंतर 47 महिन्यांत केवळ 32 बंद पुकारण्यात आले होते, तर दगडफेकीच्या घटनांमध्ये 90% घट झाली होती. जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या हातातील दगडांची जागा लॅपटॉप आणि पुस्तकांनी घेतली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम