चोपडा | प्रतिनिधी
भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरात सकाळपासूनच कांताई नेत्रालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती
यावेळी सर्वप्रथम कोणत्याही नेत्रालयचे व्यवस्थापक युवराज देसरडा,नेत्र चिकित्सक डॉ. जैतील शेख, गांधी रीचर्स फाऊंडेशन चे सदस्य प्रशांत पाटील,रजिक शेख यांच्या शाल व मोतीमाळा देऊन सत्कार करण्यात आला तदनंतर कांताई नेत्रालय तर्फे युवराज देसरडा यांनी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा यांच्या सत्कार केला यावेळी रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
युवराज देसर्डा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज रोजी भारतीय जैन संघटनेने आपल्याला डोळे तपासणीच्या शिबिर मोफत उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आम्ही आभारी आहोत डोळे तपासणीच्या वेळी ज्यांना आवश्यक असेल अशांचे ऑपरेशन करण्यासाठी कांताई नेत्रालयाने माफक दरात जळगाव येथे व्यवस्था केलेली होती या शिबिरातून जवळपास दहा रुग्ण हे ऑपरेशन करण्यासाठी जळगाव रवाना झाले कांताई नेत्रालयाने रुग्णांना जळगाव येण्या-जाण्याची सोय केली होती तसेच त्यांच्या जेवणाचा नाश्ता चहापाणी इतर खर्च सर्व कांताई नेत्रालयाने केलेला होता या शिबिरात शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवलेला होता यावेळी भारतीय जैन संघटनेचे मयंक जैन चेतन टाटिया दिनेशभाई लोढाया,विपुल छाजेड, राहुल राखेच्या,दर्शन देसलोरा, लतिश जैन, क्षितिज चोरडिया आदींनी मेहनत घेतली
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम