ज्यांना स्वतःला नाचता येत नाही ते परीक्षक…अभिनेत्री शिल्पा भडकली

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ ऑक्टोबर २०२२ । आपल्या बिनधास्त अंदाजासाठी अभिनेत्री शिल्पा शिंदे ओळखली जाते. अलीकडेच झलक दिखला जा 10 या डान्स रिअॅलिटी शोमधून ती बाहेर पडली. डान्स शोमधून बाहेर पडल्यानतंर शिल्पाने या शोच्या परीक्षकांची चांगलीच कानउघडणी केली आहे. शिल्पाने विशेषतः करण जोहरला लक्ष्य केले आहे. झाले असे की, निया शर्माने मागील आठवड्यात काली माँच्या रूपात एक नृत्य सादर केले होते. त्यावर परीक्षकांनी तिला फार कमी गुण दिले होते. यावरुन शिल्पा करण जोहरचा समाचार घेत म्हणाली, ज्यांना स्वतःला नाचता येत नाही ते येथे परीक्षक म्हणून बसले आहेत.

परीक्षकांच्या प्रतिक्रिया मुळीच पटलेल्या नाहीत
शिल्पाने एक व्हिडिओ शेअर करत सेटवर त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याबद्दल सांगितले आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा म्हणतेय, ‘माझा हा व्हिडिओ त्या परीक्षकांच्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तींसाठी आहे. मी निया शर्माचे शेवटचे नृत्य पाहिले. त्यावर परीक्षकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या मला मुळीच पटलेल्या नाहीत. मला विचारायचंय की करण सर काय आम्हाला धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट देणार आहेत का? 3 मिनिटांच्या अ‍ॅक्टमध्ये तुम्हाला संपूर्ण पिक्चर बघायचा आहे का? तुम्ही कलाकारांना तिथे बोलावता. आणखी तुम्हाला काय हवंय? ऑस्कर देणार आहात का?,’ असा प्रश्न तिने विचारला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम