नवीन गाडीतून राजने मला उतरवल ; गुप्तेनी सांगितली ती आठवण !
बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | सध्या राज्यभर गाजत असलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे मराठमोळी अभिनेत्री वंदना गुप्ते यादेखील चर्चेत आहेत. वंदना गुप्ते या नेहमीच मोकळेपणानं बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका कार्यक्रमात वंदना गुप्ते यांनी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत आलेला एक अनुभव सांगितला आहे.
सुरुवातीला वंदना गुप्ते यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रिचा एक अनुभव सांगितला आणि त्यानंतर एकदा राज ठाकरे यांनी वंदना गुप्ते यांना त्यांच्याच नव्या गाडीतून खाली उतरवलं आणि त्यांच्या गाडीचं प्लास्टिक हाताना काढलं याविषयी सांगितलं आहे. वंदना गुप्ते यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. अवधूत गुप्ते यांच्या या कार्यक्रमात वंदना गुप्ते मोकळेपणानं बोलताना दिसल्या. त्यांच्या या कार्यक्रमात वंदना गुप्ते यांनी अनेक गोष्टींविषयी सांगितलं. यावेळी अवधूत गुप्ते वंदना गुप्ते यांना प्रश्न विचारत म्हणतात की राज ठाकरेंनी गाडी थांबवून तुमच्या गाडीचं प्लास्टिक फाडलं होतं? त्यावर उत्तर देत म्हणाल्या की ‘मी नवीन गाडी घेऊन त्या गल्लीतून येत होते आणि राज नेमका तिथे फेऱ्या मारत होता. ही चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तर नवीन गाडी म्हटल्यावर सीटवर, फ्लॅपवर प्लास्टिक असतंच ना… मी काय ते काढलं नव्हतं. मी गाडी घेऊन येत होते. मला बघून तो म्हणाला, ‘उतर पहिले त्या गाडीतून.’
त्यानंतर पुढे काय झालं हे सांगत वंदना गुप्ते म्हणाल्या, राजनं मला उतर म्हटल्यानंतर मी त्याला म्हटलं अरे का पण? तर तो म्हणाणा, इथे मराठी माणूस दिसतो. कशाला ते प्लास्टिक ठेवायचंय? कशाला वाचवायचंय, कुठे काही डाग पडेल याची भीती वाटते का तुला? असं विचारलं. मग त्याच्या या प्रश्नावर मी म्हटलं की, अरे घरी जाऊन काढते. तर त्याने ऐकलं नाही. सरळ गाडीची काच खाली करायला लावली आणि फ्लॅपवरचं प्लास्टिक फराफरा ओढून फाडून टाकलं.’
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम