ठाकरे गटाच्या नेत्याने सांगितला फडतूस शब्दाचा अर्थ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ एप्रिल २०२३ ।  ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले. मी फडतूस नाही काडतूस आहे. मी गृहमंत्री आहे, याचीच अनेकांना अडचण आहे. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. बेकायदेशीर काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या व्यक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लक्ष केलं आहे. इतकेच नव्हे तर खासदार संजय राऊत यांनी फडतूस या शब्दाचे चार अर्थ सांगितले आहेत. डिक्शनरीत हे अर्थ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच कोर्टाने यापेक्षा अधिक कडक शब्दात तुमच्या सरकारवर ताशेरे ओढल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी सकाळी माध्यामांशी संवाद साधला यावेळी देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला लक्ष केलं आहे. डिक्शनरीत फडतूसचा शब्दाचा अर्थ दिलेला आहे. “वर्थलेस. मिनिंगलेस, यूजलेस आणि बिनकामाचे लोक आहेत”, असा अर्थ डिक्शनरीत आहे असं ते यावेळी म्हणाले आहेत.

तर फडतूस हा शब्द आपण नेहमी वापरतो. हे सरकारच बिनकामाचं आहे, असं आपण नेहमी म्हणतो. त्यालाच उद्धव ठाकरे यांनी फडतूस हा शब्द वापरला आहे. त्यामुळे भिजलेलं काडतूस आत घुसायचं कारण नाही. तुम्ही काडतूस असाल हो अशी भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात आम्ही खूप पाहिली आहेत. भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात उडत नाहीत, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम