ठाकरे गटाच्या नेत्याला या कारणासाठी झाली अटक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ एप्रिल २०२३ ।  राज्यातील सत्ताधारीना तगडा विरोध करण्यासाठी आता ठाकरे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र राज्यात दिसू लागले आहे. कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचे उघड झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बारसू प्रकल्पावरुन राज्य सरकारला स्थानिकांना विश्वासात घेऊन चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या या भूमिकेला विरोध केला. बारसूच्या संदर्भात शरद पवारांची भूमिका ऐकली. स्थानिक लोकांशी चर्चा करा. त्यांना विश्वासात घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे. म्हणजे काय करायचे? असा सवाल करत राऊतांनी पवारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आणि अशातच प्रकल्पाच्या विरोधात काढलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती खुद्द राऊत यांनी ट्विट करत दिली.

बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर परप्रातीयांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी काल सांगितले होते. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा आज मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारसू परिसरातील पाच गावांमध्ये जाऊन स्थानिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती राऊत यांनी काल दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम