चोपड्याच्या महाजन बंधूंनी फडविला तैवानमध्ये तिरंगा
बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३
एशियन पिकल बॉल स्पर्धा2023 मध्ये तैवान(तैयपेई) येथे आपल्या माळी समाजाचे चोपडा (पाटीलगढी)येथील चि. तेजस महाजन व वांशिक कपाडिया (मुंबई) सोबत मेन्स डबल्स मधे गोल्ड मेडल मिळवले तसेच तेजस महाजन व कुलदीप महाजन या दोघ भावंडांनी टीम इव्हेंट मध्ये सुध्दा सिल्वर मेडल प्राप्त केले व रोख बक्षीस ही मिळवून आपल्या भारत देशाचे नाव लौकिक केले.
तेजस व कुलदीप यांचे आई-वडील रवींद्र नारायण महाजन व सौ मायाताई रवींद्र महाजन हे सर्वसामान्य परिस्थितीचे असुनही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्पोर्टमध्ये सुध्दा मुलांना पाठबळ देवून भारतातील विविध नामांकित शहरात तसेच विदेशात पाठविण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.
या दोघ बंधूंचे सर्वस्तरातून मित्र परिवार, नातलग समाज बांधव यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच या दोघ बंधूंनी आगामी काळात, आई -वडील, नातलग, समाजाचे, गावाचे व आपल्या भारत देशाचे नाव लौकिक व यश प्राप्त करत राहावे हिच सदिच्छा दिली. तैवान येथे झालेल्या एशियन पिकलबॉल 2023 स्पर्धेसाठी प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (AIPA) विलेपार्ले तर्फे अरविंद प्रभूजी सर (दादा) निखिलजी माथूर सर आणि यशोधनजी सर यांचे दोघ भावांना मोलाचे सहकार्य लाभले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम