मुख्य परीक्षा या कारणाने पुढे ढकलल्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. प्रशासकीय कारणामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं MPSCनं स्पष्ट केलं आहे.

 

महाराष्ट्र दुय्यम सेवेअंतर्गत येणाऱ्या संयुक्त पेपर क्रमांक १, संयुक्त पेपर क्रमांक २ (पोलीस उपनिरीक्षक), संयुक्त पेपर क्रमांक २ ( राज्य कर निरीक्षक) तर पेपर क्रमांक २ (सहाय्यक कक्ष अधिकारी) आणि दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक या मुख्य परीक्षा २०२२ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यांपैकी पेपर १ ची परीक्षा २४ डिसेंबर २०२२, पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) ३१ डिसेंबर, राज्य कर निरीक्षक (STI), सहाय्यक कक्ष अधिकारी (Assistant) १४ जानेवारी २०२३ रोजी या परीक्षा होणार होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम