
दै. बातमीदार /२८ डिसेंबर २०२२राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पदमविभूषण खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने जनहित उपक्रम मास आयोजित करण्यात आलेला होता . सदर उपक्रमा अंतर्गत दिनांक 12 डिसेंबर 2022 पासुन गरजु जनतेसाठी शाल वाटप , अन्नदान , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांसाठी फळवाटप , वृक्षारोपण , विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासह विविध जनहिताचे कार्यक्रम राबविण्यात आले , या उपक्रमाची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आरोग्य शिबीर संपन्न होऊन सांगता झाली .
आरोग्य शिबिरात रक्तदान , आरोग्य तपासणी शिबीर , ई.सी.जी. , रक्तदाब तपासणी , रक्त गट तपासणी , मधुमेह तपासणी , अस्थी आजाराशी संबंधित तपासणी , त्वचा संबंधित विकारांची तपासणी करण्यात आली. तसेच सबंधितांना मोफत गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले . सदर आरोग्य शिबीरासाठी डॉ.संतोष पोटे , डॉ. मनीष कोल्हे , डॉ. सचिन पाटील , डॉ. गिरीश उगले या अनुभवी डॉक्टरांचे सहकार्य लाभले . त्याबद्दल सर्व डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच रक्तदात्यांचा जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र भैय्या पाटिल व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . आरोग्य शिबिरात 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले व 100 पेक्षा अधिक महिला व पुरुषांनी उपक्रमाचा लाभ घेतला .
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटिल , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला अध्यक्षा सौ. वंदना चौधरी , प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , महिला महानगर अध्यक्षा सौ. मंगला पाटिल , वाल्मिक पाटिल , रिकू चौधरी , अमोल कोल्हे , लिलाधर तायडे , सुनील माळी , डॉ. रिजवान खाटिक , किरण राजपूत , इब्राहीम तडवी , रमेश बहारे , वाय.एस. महाजन सर , अनिल पवार , मिनाक्षी चव्हाण , रहीम तडवी , भगवान सोनवणे , रफिक पटेल , विशाल देशमुख , छाया केळकर , पिनाझ फनिबंदा , राहुल टोके , सुहास चौधरी , हितेश जावळे , खलील शेख , साजिद पठाण आदि उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम