शिंदे गटाच्या मंत्र्यांनी दिला लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ मे २०२३ ।  देशात आगामी काळात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आतापासून सुरु झालेली आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी कामाला लागली आहे. यात आता राज्यातील शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभेसाठी युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गट 22 तर भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत केसरकर यांना विचारले असता लोकसभेची तयारी सर्वांनी सुरू केली आहे. एखाद्या निवडणुकीची तयारी सुरू झाली की राष्ट्रीय नेते एकत्र येतात. त्यामुळे हा सगळा विषय वरिष्ठांचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेसाठी भाजप नेहमीच जास्त जागा घेत आलेलं आहे. कारण ते केंद्रात असतात सेना राज्यात काम करते. पण आमच्या वाट्याला ज्या जागा नेहमी येतात त्या जागांवर आम्ही तयारी सुरू केली आहे, त्यामध्ये चुकीचं काहीही नसल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आधिवेशनाच्या आधी 100 टक्के मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे. मंत्रिपदाच्या वाटपाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. विरोधकांनी आधी साधा प्रोटोकॉल लक्षात घ्यावा. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे आणि बोलायचे हे विरोधक करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम