महाविकास आघाडीच्या सभेची खासदाराने मानले आभार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ एप्रिल २०२३ ।  छत्रपती संभाजी नगरात नुकतीच महाविकास आघाडीची वज्रमूठ जाहीर सभा पार पडली. यात शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले आहे. माझ्यावर टीका नेहमी केली जाते. मात्र, आज टीका केली नाही, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो. या सभेसाठी स्थानिक नागरिक नसून, बाहेरून सर्व नागरिक आणला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीची सभा होती, त्याच दिवशी स्वातंत्र्य वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. ती कशासाठी? भाजपला आणि शिंदे गटाला महाविकास आघाडीला श्रेय जाऊ द्यायचे नव्हते. पोलीस आयुक्तांना मी प्रश्न विचारतोय एकाच दिवशी यात्रेला परवानगी कशासाठी दिल्या गेली आणि का दिल्या गेली?

शहराचे वातावरण खराब होऊ शकले असते. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचं काम सरकारी पक्षाचे जास्त. मात्र, तेच कायदा मोडण्याच्या तयारीत आहेत, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. खासदार इम्तियाज जलील यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका संजय शिरसाट हे सध्या संजय राऊतांसारखे रोज सकाळी उठून मीडियासमोर बोलत आहेत.

माझं सरकारने नाही ऐकलं तरी चालेल. पण त्यांच्या सरकारने त्यांचे तरी ऐकावे, असा खोचक टोला देखील जलील यांनी शिरसाठ यांना लगावला. तसेच संजय शिरसाठ शिंदे गटाचे संजय राऊत झाले आहेत. ते रोज मीडियासमोर येऊन बोलतात त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. त्यांची इच्छा पूर्ण करा. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगतो की, शिरसाठ यांना तात्काळ मंत्रीपद द्या. माझ्या शहराला तीन नको तर चार मंत्रिपद हवे आहेत, अशी मिश्किल टिप्पणी देखील जलीली यांनी शिरसाठ यांच्यावर केली. भाषणावेळीच अजान सुरू उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच अजानला सुरूवात झाली, पण उद्धव ठाकरे यांनी त्यांचं भाषण थांबवलं नाही.

मी हिंदुत्व सोडलं असं मला सांगा मी घरी जाऊन बसेन, मी सगळ्यांना सांभाळलं होतं. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता, मग काश्मीरमध्ये मुफ्तीच्या मांडीला मांडी लावून बसले होते, ते काय होतं? तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व, अशी टीका ठाकरेंनी केली. सत्ता गेली तरी आम्ही एकत्र आहोत, अजून घट्ट झालो आहोत. मला म्हणता सत्तेसाठी तळवे चाटले, तुम्ही सत्तेसाठी मिंदेचं काय चाटत आहात? तिकडे सत्ता पाडून नितीश कुमारचं काय चाटत होतात? तुमचा कोणीही सोम्या गोम्या आरोप करेल, आम्ही सहन करायचा, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम