थंडीचा हुळहुळीत होणार नव्या वर्षाचे स्वागत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ डिसेंबर २०२२ । राज्यात सातत्यानं वातावरणात बदल होत असल्याने थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. तर काही ठिकाणी पाऊस देखील पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात थंडीचा कडा वाढला आहे. विशेषत: उत्तर भारतात तापमानाचा पारा कमालीचा घरसला आहे. मुंबईत तापमानाचा पारा घसरल्यामुळं थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागात हुडहुडी वाढली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 15 ते 20 अंशाच्या आसपास आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिमालयातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळं वायव्य भारतातील मैदानी भागात किमान तापमानात घट झाली आहे. तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने खाली आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. दिल्लीत तापमानाचा पारा हा 10 अंश सेस्लिअसच्या आसपास घसरला आहे.

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांत उत्तर भारतात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नवीन वर्षात हुडहुडी आणखी वाढणार आहे. तसेच काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. वायव्य भारतात 1 जानेवारीपासून थंडीची लाट सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्लीच्या सफदरजंगमधील प्राथमिक हवामान केंद्राच्या वेधशाळेत किमान तापमान 10.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुढच्या 24 तासामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर भारतीय मैदानी भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय बदल जाणवत आहे. त्यामुळं थंडी वाढणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम