कोरोना रुग्ण संख्या कमी झाली पण मृत्यूची संख्या कमी होईना !
दै. बातमीदार । १ मे २०२३ । देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसापासून वाढ झाली होती पण सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. देशात दिवसभरात आज 5 हजार 874 रुग्ण सापडले तर 25 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, केरळमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. 25 पैकी 9 मृत्यू केरळमध्ये झाले आहेत.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात चढउतार पाहायला मिळत असून गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी 10 हजारांपर्यंत गेलेली रुग्णसंख्या आज 5 हजार 874 वर पोहोचली. दरम्यान, रुग्णांबरोबर सक्रिय रुग्णांची 67 हजारांवर पोहोचलेली संख्या ही गेल्या आठवडाभरात 18 हजारांनी कमी होऊन आज ती 49 हजार 15 वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राज्यात आणि मुंबईतही रुग्ण संख्या कमी झाली असून मुंबई आणिराज्यात आज एकही मृत्यू झालानाही. राज्यात आज 425 रुग्ण सापडले तर 499 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आज 135 रुग्ण सापडले तर 141 जणकोरोना मुक्त झाले. सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती 928 वर पोहोचली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम