विरोधी पक्षनेत्यांनी लिहले सरकारला पत्र देत केली हि मागणी !
दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ । राज्यातील विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित रहात होते. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगलं जीवन जगता यावे, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.
अजित पवार यांनी नुकतेच राज्य सरकारला पत्र लिहून मराठी भआषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर तातडीने हे दुसरे पत्रही लिहिले आहे. महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशाकलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांसाठी निवास, भोजन, औषधोपचारांची सोय, वृध्दाश्रम सुविधा, तसेच त्यांना अल्पव्याजाने कर्ज, मुलांच्या शिक्षणाची सोय, शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.
राज्यातील मागास, अतिमागास समाजातील कलावंतांच्या पिढ्यांनी त्यांच्या त्याग, समर्पणातून ही कला जिवंत ठेवली, वाढवली, समृद्ध केली. या तमाशा कलावंतांसह राज्यातील समस्त लोककलावंतांच्या मान -सन्मानाकडे, हक्कांकडे, विकासाकडे सरकारनं लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तमाशाकलेला समृद्ध, लोकप्रिय करण्याच्या कार्यात तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तमाशाकलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या स्व. विठाबाईंचे अखेरचे दिवस हलाखीत गेले. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीही राज्य सरकारला एक पत्र पाठवले होते. त्यात पत्रात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्याकडे केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम