पोलिसाने लढविली शक्कल ; अशी घेतली लाच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ फेब्रुवारी २०२३ । देशातील भाजप सरकार लाचखोरी रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतांना पोलीस विभागातील अनेक अधिकारी लाचखोरीमध्ये अडकत असल्याचे राज्यात अनेक भागात आढळून आले आहे. अशीच एका घटना पुण्यातील हडपसर येथे घडली. वाहतूक पोलिसांकडून ‘टोईंग’ कारवाई करताना वाहतुकीस अडथळ ठरत नसलेल्या ठिकाणांहूनही वाहने उचलली जात आहेत. वाहनचालकांनी जागेवरच दंड भरण्याची तयारी दाखविली तरी त्यांना पायपीट करून चौकीवर बोलविणे, कारवाई दरम्यान अर्वाच्च भाषा वापरणे, दमदाटी करणे असे प्रकार सुरू आहेत, त्यातच दंडाची रक्कम विशिष्ट फोन नंबरवर ‘गुगुल पे’ करण्यास सांगितले जात आहे.

सदर मोबाइल क्रमांक हा शासकीय कार्यालयाचा असावा, या समजुतीतून संबंधीत वाहनचालक दंडही भरतात. परंतु, वाहतूक पोलिसांकडून दंडाची पावती दिली जात नसल्याचा तसेच असे मोबाइल नंबर सातत्याने बदलले जात असल्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. याप्रकाराबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्‍त केला आहे. “गुगुल पे लाचखोरी’ बंद करण्याबाबत वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी होत आहे.

हडपसर परिसरात महापालिकेची एकही वाहनतळ नाही. त्यामुळे पंधरा नंबर, रविदर्शन, गाडीतळ, भाजी मंडई परिसर, वैभव सिनेमा, नोबल हॉस्पिटल परिसर अशा काही ठिकाणी वाहन पार्किंगची मोठी अडचण निर्माण होते. त्यातही नागरिक उड्डाणपुलाखाली तसेच वाहतुकीला अडथळा ठरणार अशा ठिकाणी वाहने उळी करून खरेदी तसेच अन्यकामी जातात.
मात्र, हडपसर वाहतूक पोलिसांकडून अशा ठिकाणी उभी केलेली वाहने टाईंग करून उचलली जात आहेत. अनेकदा, वाहनचालकांसमोरच वाहन उचलून त्याला दंड भरण्यास सांगितले जाते. कायद्याचा धाक दाखवून झाल्यानंतर तडजोडीसाठी तयार झालेल्या पोलिसांकडून कोणत्याही मोबाइल क्रमांकावर “गुगुल पे’ करण्यास सांगितले जाते. परंतु, त्याची पावती दिली जात नाही, लाचखोरीचा हा प्रकार उघडपणे सध्या हडपसर परिसरात जोरात सुरू आहे.

हडपसर परिसरात सामान्य नागरिकांची वाहने टोईंग करून त्यांच्याकडून दंडाची रक्कम “गुगुल पे’ वर वसुल करणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून येथील हॉटेल, बार समोर रस्त्यावरच आडवी-तिडवी लावलेली वाहने उचलल जात नाहीत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यासाठी संबंधीत हॉटेल, बार मालकांशी पोलिसांचे “अर्थ’पूर्ण सहकार्य असते. याबाबत खुद्द हॉटेल, बार मालकांनीच खुलासा केला आहे. नो पार्किंचा नियम सामान्य नागरिकांवर लादून त्यांच्याकडूनही लूट सुरू असल्याने संताप व्यक्‍त केला जात आहे. हडपसर परिसरात गाडीतळ परिसरातच पिंगा घालत कारवाई करणाऱ्या हडपसर वाहतूक विभाग पोलिसांनी रविदर्शन, मांजरी रोड, पंधरा नंबर, अण्णासाहेब मगर महाविद्यालय रस्ता, महोदवनगर-मांजरी बु. रस्त्याचे पदपथ वाहनतळ म्हणून ट्रक, टॅंकरचालक तसेच खासगी चारचाकी मालकांना विकले आहेत का? अशीच चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे. गेली कित्येक महिने अशी वाहने पदपथांचा वापर पार्किंग म्हणून करीत आहेत, अशा वाहनांवर मात्र वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम