पदाचा केला होता दुरुपयोग ; सीबीआयने कोचर दाम्पत्याला घेतले ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ । २००९ आणि २०११ यादरम्यान व्हिडीओकॉन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांना कर्ज देतांना चंदा कोचर यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने ही कारवाई कथित कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली आहे. चंदा कोचर ह्या सीईओ असतांना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांच्यावर अनिमिततेचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

 

ईडीने फेब्रुवारी २०१९ मध्ये या प्रकरणात खटला दाखल केला होता. चंदा कोचर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप आहे. आज या प्रकरणामध्ये सीबीआयने कारवाई केलीय. २००९ आणि २०११ यादरम्यान व्हिडीओकॉन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांना कर्ज देतांना चंदा कोचर यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. वेणुगोपाल यांनी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेऊन Nupower Renewables मध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आलेला होता. याच प्रकरणात चंदा कोचर यांना ईडीने २०२१मध्ये अटक केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम