सोन्यासह चांदीच्या दर तूर्त स्थिरावले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसापासून देशातील सोन्यासह चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होत असतांना दिसत आहे. यात आता अमेरिकेत वाढलेल्या महागाईचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर देखील झाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सराफ बाजारातील सोने चांदीच्या किमती स्थिरावलेल्या आहेत. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या भावांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आजचा दिवस देखील सोने खरेदी करण्यासाठी उत्तम मानला जात आहे.

शुक्रवारी MCX वेबसाईट सोन्याचा बाजार भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅमने 54,940 रुपये असा सुरू आहे. यासोबत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,930 रूपयांनी व्यवहार करत आहे. मात्र गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या किमती स्थिर आहेत. शुक्रवारी सराफ बाजारात, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,100 रूपयांनीच स्थिर आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,020 रूपयांनी व्यवहार करत आहे. गुरुवारनंतर आज सोने कालच्याच भावांमध्ये व्यवहार करत आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,100 रुपये
मुंबई – 54,100 रुपये
नागपूर – 54,100 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 59,020 रूपये
मुंबई – 59,020 रूपये
नागपूर – 59,020 रुपये

आज सराफ बाजारातील सोन्याच्या किमती स्थिर असल्या तरी चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार मौल्यवान चांदीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी चांदी खरेदी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. शुक्रवारी बाजारात, 10 ग्रॅम चांदीची किंमत 735 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. खालच्या भावानुसार आज 10 ग्रॅम चांदीमध्ये 10 रुपयांचा तर 100 ग्रॅम चांदीत 50 रुपयांचा फरक पडला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम