सोन्यासह चांदीच्या दरात दिवसेदिवस घसरण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑक्टोबर २०२३

देशात गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात नियमित घसरण होत असल्याने ग्राहकांनी बाजारात देखील सोने व चांदी खरेदीसाठी गर्दी केली आहे. सोन्याचा भाव आज 56,000 च्या जवळ आहे. याशिवाय चांदीच्या भावातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव आज 67,000 च्या जवळ आहे.

याशिवाय जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात घसरणीमुळे सोन्याचा भाव 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. भविष्यात सोने आणखी स्वस्त होऊ शकते.

आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज एमसीएक्सवर सोने 0.18 टक्क्यांनी घसरून 56,827 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 0.52 टक्क्यांनी घसरून 67,042 रुपये प्रति किलोवर आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भावा प्रति औंस 1815 डॉलरच्या खाली पोहोचली आहे. सोन्याची ही सात महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. कॉमेक्सवर चांदीचा भाव 21.19 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम