सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक ; जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । ५ एप्रिल २०२३ । गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दारात कमी अधिक होत असून त्यानंतर यातील दर स्थिरसावर झाले होते. पण आज सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जगभरातील बाजारात गोंधळामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. फ्युचर्स मार्केट असो की स्पॉट मार्केट, आजवरच्या सर्वात महाग दराने सोने विकले जात आहे.
खरं तर, अमेरिकेतील बेरोजगारी दरामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव झपाट्याने वाढला. कमकुवत डॉलर निर्देशांकाचाही त्याला पाठिंबा मिळाला, जो दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.सोन्याची किंमत 13 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, जी 2040 प्रति औंस डॉलर आहे. त्याचप्रमाणे चांदीने 25 प्रति औंस डॉलरचा आकडा पार केला. चांदीच्या दराने एका वर्षातील उच्चांक गाठला आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमतींनी नवा विक्रम नोंदवला आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई – 62,070 रुपये
दिल्ली – 61,510 रुपये
हैदराबाद – 61,360 रुपये
लखनऊ – 61,510 रुपये
मुंबई – 61,360 रुपये
पुणे – 61,360 रुपये
नागपूर – 61,360 रुपये
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम