सोन्याचे भाव अचानक घसरले ; जाणून घ्या सविस्तर !
दै. बातमीदार । २९ जानेवारी २०२३ । देशात सोने व चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कमी अधिक प्रमाणात होत असतांना दिसून येत आहे. यावर अनेक ग्राहकांचे लक्ष लागून आहे. तर येत्या काही दिवसात विवाह सोहळ्याचे दिवस सुरु होत असतानाचा आज अचानक सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. यामुळे गेले काही दिवस जे लोक सोने खरेदी आणि गुंतवणूक करण्यास कचरत होते, त्यांना पुन्हा एकदा गुंतवणुकीची चांगली संधी मिळाली आहे.
कापूस उत्पादक शेतकरी हवाल दिल ; व्यापाऱ्यांनी भाव उतरवले !
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमती गेल्या आठवड्यात ₹57,150 प्रति 10 ग्रॅमच्या नवीन उच्चांकावर गेल्या होत्या. मात्र, प्रॉफिट बुकिंगच्या दबावामुळे शुक्रवारी सोने पुन्हा 56,875 रुपयांवर बंद झाले आहे.
“या” शेतीतून शेतकरी कमवितो कोट्यावधी रुपये !
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 1,927 डॉलर प्रति औंस या नऊ महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाले. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमती अस्थिर राहतील आणि आणखी काही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. यामागे गुंतवणूकदारांनी 2023 ची पहिली यूएस फेड बैठक आणि भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर लक्ष ठेवले आहे.
शेतकरीने या फुलाची लागवड केल्यास लाखो रुपये कमविणार !
तज्ज्ञांनी दीर्घ मुदतीसाठी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना प्रत्येक घसरणीच्या वेळी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मिंटच्या बातमीनुसार, कमोडिटी तज्ज्ञ सुगंधा सचदेवा यांनी सांगितले की, “सोन्याच्या किमतीत चांगली सुधारणा झाल्यानंतर पुन्हा खरेदीत तेजी येईल. भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतीला प्रति 10 ग्रॅम ₹ 57,200 या पातळीवर विरोध होत आहे. त्याच वेळी, MCX वर सोन्याचा सपोर्ट ₹ 56,200 वर आहे.
शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरहि या योजनेचा मिळेल लाभ !
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम