सोन्याच्या भावाने ग्राहकांना फोडला घाम !
दै. बातमीदार । ५ मे २०२३ । देशात वाढती महागाईने अनेकांना घाम फोडला आहे. त्यातच आता लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्याने तेजी दिसून येत आहे. आजही सोन्याचा भावात तेजी दिसत आहे. सोन्याचा भाव 61,500 च्याही पुढे गेला आहे.
सोन्याच्या भावात लवकरच आणखी तेजी बघायला मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याच बरोबर चांदीचा भावही वाढला आहे. आज चांदीचा भाव 78,000 च्याही पुढे गेला आहे. जागतिक बँकिंग सेक्टरमधील चिंतेच्या वातावरणामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.
किती महागलं सोनं-चांदी? – मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी वधारून 61,571 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदी 0.16 टक्क्यांनी वाढून 78,161 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
68,000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचा भाव – तज्ज्ञांनी म्हटले आहे की, 25 बेसिस प्वाइंट्सच्या वाढीबरोबरच अमेरिकेतील व्याजदर 16 वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. पुढील आर्थिक वर्षापर्यंत सोन्याचा भाव 66,000-68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. तर पुढील दोन महिन्यांत सोन्याचा भाव 62,500 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचलेला दिसेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम