दै. बातमीदार । २ फेब्रुवारी २०२३ । राज्यात नुकतेच लग्न समारंभाची जोरदार तयारी सुरु असतानाच दुसरीकडे १ फेब्रुवारी झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या भावाने पुन्हा नवा टप्पा गाठला आहे. भारतीय बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे. अर्थसंकल्पानंतर गुरुवारी सोन्याने (सोने) 700 रुपयांच्या वाढीनंतर सार्वकालिक उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर 58 हजार 689 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपयांवर बंद झाला होता.
“या” कॉमेडियन सोडला कपिलचा शो !
जर आपण चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदी 1 हजार 805 रुपयांनी महागली आहे. आता चांदी 71 हजार 250 रुपये किलोवर पोहोचली आहे. 1 फेब्रुवारी रोजी चांदीचे दर 69 हजार 445 प्रतिकिलो होते.
फक्त 99 रुपयात 28 दिवस नेट आणि कॉल जिओ देखील फेल !
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्पात सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क 20% वरून 25%, चांदीवर 7.5% वरून 15% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतरच भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढू लागल्या. तसेच केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे. यामुळे 2023 मध्ये सोने 64,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. 1 फेब्रुवारी 2022 रोजी तो 48 हजार 8 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता, तो आता 58 हजार 689 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या 1 वर्षात त्याची किंमत 10,681 रुपयांनी (20%) वाढली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम