बाजारात सोन्यासह चांदीचे भाव वधारले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ एप्रिल २०२३ ।  हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सन नुकताच येवून गेला यावेळी सोन्याच्या बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली त्यात सोन्याचे दराने मोठी चकाकी घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतेय. आज सोनं आणि चांदी दोन्हींचे भाव वधारले आहे. वायदा बाजार म्हणजेच मल्टी कमोटिडी एक्सचेंजवर गुरुवारी 27 एप्रिलला 24 कॅरेट सोनं 257 रुपयांच्या तेजीसह 60,150 रुपये प्रति 10 ग्रामवर आहे.

सोनं सकाळी 11 वाजेपर्यंत 60,155 रुपयांवर व्यवहार होत होता. तर आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी सोन्याचा दर 59,893 रुपयांवर बंद झाला होता. दुसरीकडे चांदीबद्दल बोलायचे झाले तर गुरुवारी चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीचा भाव 394 रुपयांच्या वाढीसह 74,213 रुपयांवर उघडला. काल म्हणजेच बुधवारी चांदी 73,819 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आजच्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर सकाळी 11 वाजेपर्यंत चांदी 74,316 रुपयांवर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
कोल्हापूर : 24 कॅरेट 60,700 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जातंय. तर 22 कॅरेट 55,840 रु. प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जातंय. लातूर : 24 कॅरेट 61070 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जातंय. तर 22 कॅरेट 55980 रु. प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जातंय. नाशिक : 24 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर हा आज 61 हजार 70 रुपये आहे. तर 22 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर हा 55 हजार 980 रुपये आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर-
दिल्ली- 22 कॅरेट 56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. मुंबई- 22 कॅरेट सोने 55,950 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. कोलकाता- 24 कॅरेट सोने 55,950 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. चेन्नई- 22 कॅरेट सोने 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम