कर्नाटक राज्यापेक्षा दहा पट अधिक प्रभावी असेल प्रस्ताव ; देसाई

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ डिसेंबर २०२२ । राज्यात गेल्या महिन्यात सीमावादावरून मोठे राजकारण घडले होते. या नंतर काही शहरामध्ये आंदोलन हि झाले पण यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी चुप्पी साधली होती. त्यानंतर दिल्ली दौरे हि झाले पण आजपर्यत मार्ग यावर निघालेला नाही तर दुसरीकडे नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारही सीमावादावर प्रस्ताव आणणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. पुढील आठवड्यात सीमावादवर प्रस्ताव आणला जाणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक राज्यापेक्षा दहा पट अधिक प्रभावी असेल, असं देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव कर्नाटक सरकारने पारित केला होता. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला दिला. तसेच यावेळी भाषण करताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर टीका केली.

शंभूराज देसाई यांनी नागपूर येथे विधानमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ”राज्य सरकार सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर विस्तृत प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक सरकारपेक्षा दहा पट अधिक प्रभावी असेल.” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतरही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामते हा वाद चर्चेनं सोडवला जाऊ शकतो, असेही देसाई म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम