जनतेला मिळणार मोठा दिलासा : एलपीजी सिलिंडरवर मिळणार सबसिडी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ मे २०२३ ।  देशातील वाढती महागाई लक्षात घेता आजपर्यत कुठल्याहि पर्यत नागरिकांना दिलासा नव्हता पण आता केद्र सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर बहुतांश घरांमध्ये गॅस कनेक्शन आहेत. ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांच्यासाठी एक मोठी खूशखबर आहे. सरकारकडून एलपीजी सिलिंडरवर सबसिडी पुन्हा सुरू होऊ शकते, अशी बातमी आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या ऊर्जा संक्रमण समितीच्या अहवालात वर्षाला सात ते आठ सिलिंडरवर सबसिडी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, सरकार सबसिडी देण्याबाबत पुनर्विचार करू शकते. तुम्हाला सांगतो की, ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ मोदी सरकारने 2016 मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून, सप्टेंबर 2022 पर्यंत, 9.5 कोटी अल्प उत्पन्न कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत. आज देशातील 30 कोटी घरांमध्ये एलपीजीचा वापर केला जात आहे.यापूर्वी 12 सिलिंडरवर सबसिडी मिळत होती.

अहवालात असेही सांगण्यात आले आहे की एलपीजीच्या उच्च किंमतीमुळे देशातील 85 टक्के घरे स्वयंपाकासाठी एलपीजी पूर्णपणे वापरण्यास सक्षम नाहीत. तुम्हाला सांगतो की, कोरोनाच्या आधी सरकारकडून वर्षाला 12 सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. मात्र आता आठ सिलिंडरवर एलपीजी सबसिडी देण्याची चर्चा आहे. अनुदानित एलपीजी सिलिंडरची संख्या कमी केल्याने, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या एकूण रकमेत 13 ते 15 टक्क्यांनी घट होईल.
साधारणपणे असे मानले जाते की घरात स्वयंपाक करण्यासाठी वर्षाला आठ सिलिंडर लागतात. अहवालात पूर्वीप्रमाणेच श्रीमंतांच्या वतीने सबसिडी सोडण्याचे म्हटले आहे. याशिवाय एका कुटुंबाने दरवर्षी तीन सिलिंडर घेतल्यास त्यांना चार ते सात सिलिंडर घेणाऱ्यांपेक्षा अधिक अनुदान दिले जाईल, असेही सांगण्यात आले. आम्ही तुम्हाला सांगतो की देशातील तीन चतुर्थांश कुटुंबांकडे अजूनही एलपीजी कनेक्शन नाही. या कुटुंबांचे मासिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम