नागरणी यंत्रात सापाचा धिंगाणा; घडले माणुसकीचे दर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ नोव्हेबर २०२२ मुक्ताईनगर तालुक्यात चांगदेव परिसरात एका शेतात काम सुरु असतांना एका सापाने नागरणी यंत्रात प्रवेश करीत धिंगाणा घातला होता. यावेळी सर्पमित्रासह येथील शेतकरी बंधूनी एक माणुसकीचे दर्शन घडवून आणले.

काय आहे घटना
तालुक्यातील चांगदेव येथे दि ४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सर्पमित्र संतोष म्हस्के यांना चंदन महाजन यांचा फोन आला कि, शेतात साप आहे तुम्ही त्याला जीवनदान देण्यासाठी या, सर्पमित्र लागलीच घटनास्थळी धाव घेत गेले असता, शेतात नागरणी सुरु असतांना नागरणी यंत्रामध्ये साप होता त्या सापाला बाहेर निघता येत नसल्याने सापाची धडपड सुरु होती, त्या धडपडीला येथील शेतकरी घाबरत होते. पण घटनास्थळी सर्पमित्र दाखल झाल्याने सर्वानीच निश्वास सोडला. सर्पमित्राने नागरणी यत्रांमध्ये अडकलेल्या गभीर सापाला बाहेर काढत मुक्ताई नगरातील पशु वैदकिय रुग्णालयात दाखवीत याठीकाणी असलेले वन विभागाचे अधिकारी दिपाली जाधव, सर्पमित्र संतोष म्हस्के, शेखर पाटील यांनी सापावर उपचार करीत सापाला जीवनदान देत एक माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या सापाला जीवनदान देणाऱ्या सर्पमित्र संतोष म्हस्के यांचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम