काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सार्थ अभिमान ; पालकमंत्री पाटील !
बातमीदार | २८ ऑगस्ट २०२३ | पूर्वी पाणीपुरवठा विभागाला केवळ ७०० कोटींचे बजेट होते. मात्र आता जलजीवन मिशन मुळे ५० हजार कोटी पेक्षाही जास्त बजेट आहे. त्यामुळे राज्याला पिण्याचे पाणी पाजण्याचे पुण्याची सेवा करण्याची संधी मिळाली असल्यामुळे मी भाग्यशाली मंत्री आहे. रावेर तालुक्यात 89 गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर असून गरीब व वंचित पात्र लाभार्थ्यांचेच संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण मंजूर करण्याचे समितीला निर्देश केले. काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभिमान असून शेतकरी हितासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. जनता हीच आपली श्रद्धा असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. एस. टी. च्या महिलांना निम्मे तिकीट व ज्येष्ठांना मोफत प्रवासामुळे रिक्षावाले नाराज झाले असले तरी त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे लवकरचं रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले . तालुक्यातील केर्हाळा बु।। येथील जलकुंभ भुमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, राज्यात ५२ हजार रुपये कोटी खर्च करून जलजीवन मिशन राबवणार्या सरकारने मोफत शिक्षणासह दोन हजार दवाखाने व रुग्णांना पाच लाख रुपयांचा मोफत औषधोपचार अशा आरोग्याच्या सुविधा, शेतकर्यांसाठी १ रूत पिकविमा सुरू केल्या आहेत. तसेच रावेर – बऱ्हाणपूर मार्गासाठी ७५ कोटींचा निधी मंजूर असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. असल्याने राज्याच्या विकासासोबत कुटूंबाची व्यवस्था राखणारे हे सरकार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत व संजय गांधी निराधार समिती व ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जि. प. च्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, भाजप लोकसभा क्षेत्राध्यक्ष नंदकिशोर महाजन, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, काँग्रेसचे डॉ. केतकी पाटील, माजी सभापती सुरेश धनके, युवाचे श्रीकांत महाजन, पद्माकर महाजन, सरपंच दिपाली लहासे, उपसरपंच सविता पाटील, रावेर कृउबा सभापती सचिन पाटील, यावलचे कृउबा सभापती हिरालाल चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, काँग्रेस तालूकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, संगांनियो समिति अध्यक्ष छोटू पाटील, कृउबा संचालक ग्रा. स. चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, संजय चौधरी, राजेंद्र इंगळे, विनोद पाटील, प्रभाकर पाटील,संतोष महाजन, भूषण गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे असून सर्वांना घेऊन चालणारे जिल्ह्याचे कर्तृत्ववान नेतृव असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे नंदकिशोर महाजन, एनएसयुआयचे धनंजय चौधरी व भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनीही मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, संजय चौधरी व सर्व ग्रा. पं. पदाधिकारींनी परिश्रम घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम