‘हर हर महादेव’ची गर्जना देशभरात घुमली ; एका दिवसात विक्रमी कमाई

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ । राज्यात इतिहासातील कुठलाही चित्रपट आला कि तो नक्की सुपरहिट होत असल्याचे भरपूर उदाहरने आहेत. तसाच सध्या दिवाळीच्या धूम धडाक्यात सुरु असलेला ‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजचा ‘हर हर महादेव’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. सध्या ऐतिहासिक चित्रपटांची मालिका सुरू असल्याने या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत काहीच कल्पना नव्हती, परंतु पहिल्याच दिवशी ‘हर हर महादेव’ची गर्जना देशभरात घुमली आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरलाही तूफान प्रतिसाद मिळाला होता. अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय आणि एकूणच चित्रपटाचे ऐतिहासिक रूप पाहून प्रेक्षक आवाक झाले होते. त्यामुळे चित्रपटालाही तसाच दमदार प्रतिसाद मिळत आहे. सध्या या चित्रपटाचे 400 चित्रपटगृहांमध्ये, पाच भाषांमध्ये 1200 शो सुरू आहेत. हे सर्व शोज् हाऊसफुल्ल हॉट असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे.पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटी अशी मोठी धडाकेबाज कमाई केली. पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा गाठणे ही मोठी बाब आहे, त्यामुळे प्रतिसाद अजून वाढला तर या चित्रपटाचे आणखी काही शो लावण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम