१३ रुपये असलेल्या शेअरची किमत आज आहे ४ हजारावर !

बातमी शेअर करा...

बातमीदार  | १३ ऑगस्ट २०२३ देशातील अनेक लोक खूप कमी वेळेत जास्त पैसे कमविण्यासाठी शेअर मार्केट मध्ये काम करीत असतात. भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशाच एका कंपनीचे नाव म्हणजे, सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअर सध्या 4,070 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या वीस वर्षांत कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल ३०३४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत, शेअरची किंमत प्रति शेअर ₹13.50 वरून ₹4070.00 वर पोहोचली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वीस वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये ₹1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज त्याचे ₹3.01 कोटी झाले असते.
या शेअरने पाच आणि एका वर्षाच्या कालावधीतही मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरची किंमत ₹1191.80 प्रति शेअर वरून सध्याच्या पातळीवर पोहोचली आहे. या काळात 241.50 टक्के एवढा परतावा मिळाला आहे.

Supreme Industries ही भारतातील एक मुख्य प्लास्टिक प्रोडक्शन कंपनी आहे. देशभरात हिच्या 25 मॅन्यूफॅक्चरिंग सुविधा आहेत. ही कंपनी विविध उत्पादनांच्या कॅटेगिरीमध्ये काम करते. जसे, प्लास्टिक पाईपिंग सिस्टम, क्रॉस-लॅमिनेटेड फिल्म आणि उत्पादने, संरक्षक पॅकेजिंग उत्पादने, औद्योगिक मोल्डेड घटक, मोल्डेड फर्निचर आणि मिश्रित LPG सिलिंडर.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम