शिंदे सरकार करणार मोठी नोकर भरती ; मंत्री महाजनांची अधिवेशनात घोषणा !
दै. बातमीदार । २१ डिसेंबर २०२२ । राज्यातील नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. यामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळातील नेत्यांनी मोठी नोकर भरती करण्याची घोषणा केलीय. आगामी काळात लवकरच डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागा टीएसच्या माध्यमातून भरल्या जातील, अशी घोषणा बुधवारी आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्याची तयारी सुरू केलीय. विशेषतः नागपूरमधील ‘एनआयटी’ भूखंड वाटप प्रकरण येत्या काळात गाजण्याची शक्यताय.
गिरीश महाजन यांनी आज नोकर भरतीची मोठी घोषणा केली. त्यात डॉक्टरांची तीनशे पदे भरली जाणार आहेत. शिवाय २८ टक्के पदे रिक्त आहेत. एमपीएससी मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार मेडिकल बोर्ड तयार करणार असल्याचे महाजन म्हणाले. राज्य सरकारने औषध खरेदीमध्येही मोठा बदल केलाय. त्यात आता हाफकिन 70 टक्के टक्के औषध खरेदी करेल, तर हॉस्पिटल 30 टक्के औषध खरेदी करेल. हे प्रमाण पूर्वी अनुक्रमे 90 टक्के आणि 10 टक्के होते. आता हॉस्पिटलला औषधी खरेदीचे अधिक अधिकार दिलेत. औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांना अनेकदा तात्काळ व्हेटिंलेर मिळणे शक्य होत नाही. हे पाहता या ठिकाणी लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही महाजन यांनी दिले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम