केंद्र सरकारचे आजपासून विशेष अधिवेशनास होणार सुरुवात !
बातमीदार | १८ सप्टेंबर २०२३
आजपासून केंद्र सरकारचे २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. 17व्या लोकसभेचे हे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असेल.
या कालावधीत चार विधेयके मांडली जाणार आहेत. 13 सप्टेंबर रोजी राज्यसभेने जारी केलेल्या संसदीय बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्नोत्तरे करण्यासाठी 9 मुद्द्यांची यादी तयार केली आहे. या अधिवेशनात विरोधी आघाडी I.N.D.I.A तील 24 पक्ष सहभागी होणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी राज्यसभेत 75 वर्षांचा संसदीय प्रवास, उपलब्धी, अनुभव, आठवणी आणि धडे यावर चर्चा झाल्यानंतर पुढील अधिवेशन 19 सप्टेंबरपासून नवीन संसदेत पूर्ण होईल.
तत्पूर्वी 17 सप्टेंबर रोजी उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी नवीन संसद भवनावर तिरंगा फडकावला होता. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक झाली. या काळात अनेक पक्षांनी महिला आरक्षण विधेयक मांडण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी जोरदार वकिली केली. बैठकीतील अनेक नेत्यांनी महिला आरक्षण विधेयक १५ दिवसांच्या विशेष अधिवेशनात मंजूर करावे, असे सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम