राज्याला मुख्यमंत्री नाहीत ; संजय राऊतांची टीका !
दै. बातमीदार । १७ मार्च २०२३ । राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतांना सताधारीसह विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतांना दिसून येत आहे. तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. राज्याचे खरे सूत्रधार तेच आहेत. राज्य तेच चालवतात. त्यामुळे आम्ही त्यांनाच प्रश्न विचारतो. या राज्याला मुख्यमंत्री नाहीत, मख्ख मंत्री आहेत. मख्खपणे सगळे चालले आहे. त्यामुळे सर्व सूत्रे फडणवीस यांच्या हातात आहे असा टोला खासदार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले, शेतकरी, बेरोजगार रस्त्यावर उतरलाय. राज्य अस्वस्थता आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रात रोज घडत आहेत. गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. मात्र त्यांना गुन्हेगारांचा बचाव करावा लागत आहे. संजय राऊत म्हणाले, देवेंद्रांकडून आम्हाला अशी अपेक्षा नाही. ते 5 वर्षे आमच्यासोबत असताना त्यांचा कारभार आम्ही पाहिला आहे. मात्र आता ते तसे राहिले नाही. म्हणूनच ‘काय होतास तू काय झालास तु’, असे मी म्हटलो. त्यांचे हात दगडाखाली अडकेलेले आहेत. तो काढताही येत नाही आणि ठेवताही येत नाही, अशी फडणवीस यांची अवस्था झाली आहे.
संजय राऊत म्हणाले, खंडणी, ब्लॅकमेलिंग सुरु आहेत. नाकाने कांदे सोलण्याचे काम सुरु आहे. ते सतत आमचा अडीच वर्षांचा काळ काढतात. आम्ही भाजपसारखे कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर तसे संस्कार नाही. माझ्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. महाराष्ट्रात असे प्रकार घडू नये. कुठल्याही महिलेला मग त्या मुख्यमंत्री, उपमुख्यंमंत्र्यांच्या पत्नी असो किंवा सामान्य महिला असो कोणालाही अशाप्रकारे ब्लॅकमेलिंग होऊ नये. संजय राऊत म्हणाले, मी राहुल कूल यांच्या 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण काढले आहे, त्यांची चौकशी करा. ते उपमुख्यंमंत्र्यांचे खासमखास आहेत. कुल यांना कोण वाचवत आहे, त्यावर बोलण्याची मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का? लाल वादळ येऊन ठेपले आहे. किती काळ त्यांना रोखणार. अराजकतेची ठिणगी पेटली तर महाराष्ट्रात वणवा पेटेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम