२ रुपयाचा स्टॉकने गाठला मोठा उच्चांक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ एप्रिल २०२३ ।  देशात अनेक लोक शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करीत असतात त्यातील अनेकाना यात पैसे कमविता जरी येत नसले तरी भरपूर लोकांना यामध्ये यशस्वी वाटचाल ते करू शकतात आता शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना केवळ एकाच वर्षात मल्टीबॅगर परतावा देत आश्चर्यचकित केले आहे.

असाच एक स्टॉक म्हणजे, पल्सर इंटरनॅशनलचा आहे. गेल्या वर्षी मे 2022 मध्ये, 2 रुपयांवर असलेला हा स्टॉक सध्या सातत्याने 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमुळे चर्चेत आहे. बुधवारी अपर सर्किटनंतर शेअरचा भाव 52.18 रुपये एवढा होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या कालावधीत 4300 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. हा शेअर बीएसईवर तीन वर्षांच्या कालावधीत 4248.33 टक्क्यांनी वधारला. दोन वर्षांत 3378.67 टक्क्यांनी वधारला, तर एका वर्षात 2535.35 टक्क्यांनी वधारला आहे. याच बरोबर या शेअरने सहा महिन्यांत 2198.68 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

याशिवाय, तीन महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांना 1080.54 टक्के एवढा परतावा मिळाला. तसेच एका महिन्याचा परताना जवळपास 165 टक्के एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रेडिंग आणि कंसल्टिंगशी संबंधित कंपनी पल्सर इंटरनॅशनल कंपनी 15 ऑक्टोबर 1990 रोजी स्थापन झाली. ही कंपनी सध्या, एक गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून काम करते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम