
मैदानात सूर्याची जोरदार फटकेबाजी ; मिळवला आरमात विजय !
दै. बातमीदार । १० मे २०२३ । इंडियन प्रीमियर लीगचा कहर आता चांगलाच रंगत आला आहे. यात मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ६ गडी राखून आरामात विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने २०० धावांचे लक्ष्य अवघ्या 16.3 षटकात पूर्ण केले. बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या खेळीचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले.
ईशान किशनने या सामन्यात 102 मीटर लांब षटकार ठोकला. पंचांनी नाबाद घोषित केल्यानंतर बंगळुरूचा विराट कोहली आणि मुंबईचा रोहित शर्मा डीआरएसमध्ये बाद झाले. नेहल वढेराने प्लेयर ऑफ द टूर्नामेंटसाठी देण्यात येणाऱ्या गाडीवर बॉल मारला आणि विष्णू विनोदने चपखल झेल घेतला. या बातमीत जाणून घ्या सामन्यातील असेच काही महत्त्वाचे क्षण आणि सामन्यावर त्याचा इम्पॅक्ट कसा झाला.
पहिल्याच षटकात कोहली डीआरएसवर बादसामन्याच्या पहिल्याच षटकात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली बाद झाला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर जेसन बेहरनॉफने शॉर्ट पिच बॉल टाकला, विराटने पुढे जाऊन मोठा शॉट खेळला. पण चेंडू मागे गेला. मुंबईने झेलबादची अपील केली, पण पंचांनी नॉट आऊटचे संकेत दिले.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने डीआरएस घेतला, रिप्लेमध्ये बॉल कोहलीच्या बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षकाकडे गेल्याचे दिसून आले. पंचांनी आपला निर्णय बदलला आणि एका धावेवर कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
दुसऱ्या डावात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही डीआरएसमध्ये बाद झाला. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू वनिंदू हसरंगाने चांगल्या लांबीवर टाकला, रोहितने पुढे होऊन शॉट खेळला, पण चेंडू त्याच्या पॅडला लागला. बंगळुरूने अपील केले, पण अंपायरने नॉट आऊटचे संकेत दिले. संघाने डीआरएस घेतला, रोहित रिप्लेमध्ये बाद दिसला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम