सुप्रीम कोर्टाने टू-फिंगर टेस्टवर टाकली बंदी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ ऑक्टोबर २०२२ । खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारांना या टेस्टशी संबंधित दिशानिर्देश सर्वच सरकारी व खासगी रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्याचेही निर्देश दिलेत. एवढेच नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून पीडितेची इतर टेस्टद्वारे तपासणी करण्याचे प्रशिक्षण करण्याचेही निर्देश दिले. भावी डॉक्टरांना ही टेस्ट न करण्याचा सल्ला देण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाचा आढावा घेण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बलात्कार प्रकरणात करण्यात येणाऱ्या टू-फिंगर टेस्टवर बंदी घातली. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड व न्यायमूर्ती हेमा कोहली यांच्या खंडपीठाने यापुढे ही टेस्ट करणाऱ्या व्यक्तींना गैरवर्तनाप्रकरणी दोषी ठरवले जाईल असा इशारा दिला. दुर्दैवाने आजही ही टेस्ट केली जाते, असे मत कोर्टाने या प्रकरणी नोंदवले. खंडपीठाने या प्रकरणी आरोग्य मंत्रालयाला कोणत्याही स्थितीत लैंगिक शोषण किंवा बलात्कार पीडितेची कोणत्याही स्थितीत टू फिंगर टेस्ट होता कामा नये याची काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिलेत. तेलंगणा हाय कोर्टाने बलात्कार कांडाप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला एक दोषसिद्धीचा निर्णय रद्दबातल केला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

खंडपीठ आपल्या निकालपत्रात म्हणाले, “कोर्टाने वारंवार बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्ट न करण्याचे आदेश दिले. या टेस्टला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. ही टेस्ट महिलांवर बलात्कार करण्यासारखीच आहे. सेक्शुअली सक्रिय महिलांवर बलात्कार होत नाही या चुकीच्या धारणेवर ही टेस्ट अवलंबून आहे.”

काय आहे रेपची पुष्टी करणारी टू-फिंगर टेस्ट?
ही एक मॅन्युअल प्रक्रिया आहे. त्यात डॉक्टर पीडितेच्या गुप्तांगात एक किंवा दोन बोटे टाकून ती व्हर्जिन आहे की नाही हे तपासून पाहतात. बोट सहजपणे गेले तर ती लैंगिकदृष्ट्या सक्रिय असल्याचे मानले जाते.
या प्रक्रियेवर आतापर्यंत अनेकदा टीका झाली. अनेकांनी ही प्रक्रिया बलात्कार पीडितांसाठी अवमानकारक असल्याचा आरोप केला. तज्ज्ञांच्या मते, ही टेस्ट अशास्त्रीय असून, तिला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदे काय म्हणतात?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यापूर्वीच टू फिंगर टेस्ट अनैकित असल्याचे स्पष्ट केले आहे. बलात्कार प्रकरणात केवळ हायमनच्या चाचणीने काहीच कळत नाही. याऊलट या टेस्टमुळे पीडितेच्या मानवाधिकारांचे उल्लंघन व तिला वेदनांना सामोरे जावे लागते. हे लैंगिक हिंसाचारासारखेच आहे. पीडितेवर बलात्कार करण्यासारखे आहे, असे संघटनेने म्हटले होते. जगभरातील अनेक देशांत टू फिंगर टेस्टवर बंदी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम