बातमीदार | २६ ऑक्टोबर २०२३
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून, १५ नोव्हेंबरच्या पुढे थंडी वाढेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रात देखील उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले आहेत. राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे रात्रीचे तापमान १७ अंशांवर होते. त्यापेक्षा २ अंशांनी जळगावचे तापमान कमी म्हणजेच १५ अंशांवर होते. दुसरीकडे दिवसाचे तापमान ३५ अंशांवर असल्यामुळे दिवसा उकाडा जाणवत आहे.
एकीकडे दिवसा जास्त, तर रात्री कमी होणारे तापमान अशी स्थिती सध्या राज्यात आहे. समुद्राच्या पाण्याच्या तापमानात फारसा फरक दिसून येत नसल्याने थंडीवरही फारसा परिणाम जाणवणार नाही. १५ नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा कडाका वाढेल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम