गटासाठी ‘चोर’ शब्द योग्य ; संजय राऊत !
दै. बातमीदार । ८ मार्च २०२३ । राज्यातील ठाकरे व शिंदे गटातील वाद आजही कायम असून ते कुठेही थांबण्याचे नाव घेत नाही एका गटाने टीका करताच दुसरा गट प्रतीउत्तर देत आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
विशिष्ट गटासंदर्भात वापरलेला चोर हा शब्द अतिशय योग्य असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांना हक्कभंगाच्या कारवाई संदर्भात नोटीस देण्यात आली आहे, यावर बोलताना संजय राऊत यांनी आपण बोललं ते योग्य असल्याचं सांगितलं. त्याशिवाय नोटीसला उत्तर का दिले नाही? याबाबतही राऊतांनी स्पष्टीकरण दिलं.
ही एक विधिमंडळाची, संसदेची प्रक्रिया असते. मला हक्कभंगाची नोटीस मिळाली त्यावेळी मी मुंबईत नव्हतो, त्यामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही. आता अधिवेशन सुरू झालेलं आहे. विधिमंडळातल्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करेन आणि कशाप्रकारे काय प्रोसेस आहे ते पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देईन, असे राऊत म्हणाले. हक्कभंग होईल असं मी काहीही वक्तव्य केलेलं नाही, चोर हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं मर्यादित होतं, असेही राऊत म्हणाले.
या देशातील परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती एकच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आम्ही घाबरत नाही या लोकांनी अतिशय बेकायदेशीरपणे नाव आणि चिन्ह काढून घेतलं, तरी शिवसैनिक लढतो आहे. काल सुद्धा लालू यादव यांच्यावर धाडी पडल्या पण गौतम अदानींना नोटीस पण बजावली नाही. धाडी कोणावर टाकताय? विरोधी पक्षावर. जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार, असे संजय राऊत म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम