
राज्यातील ठाकरे पॅटर्न तामिळनाडू सरकारने राबविले !
दै. बातमीदार । १४ डिसेंबर २०२२ । तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपल्या पुत्राला राजकारणात सक्रीय करीत राज्याची मोठी जबाबदारी त्यांना दिली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे ज्येष्ठ पुत्र उधयानिधी स्टॅलिन यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या साध्या समारंभात उधयानिधी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) चे आमदार आणि पक्षाच्या युवा आघाडीचेसचिव उदयनिधी स्टॅलिन यांना तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी मंत्रीपदाची शपथ दिली.
पक्षाचा ट्रेडमार्क असलेला पांढरा शर्ट घालून उधयानिधी यांनी आपले वडील आणि पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्या शैलीत तमिळ भाषेत शपथ घेतली. त्यांच्या शर्टवर द्रमुकच्या युवा आघाडीचा लोगो छापलेला होता. शपथविधी सोहळा १० मिनिटांत संपला. त्यानंतर राज्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उदयनिधी यांचे अभिनंदन केलं.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम